My India: Shejarti

SHARE NOW

Showing posts with label Shejarti. Show all posts
Showing posts with label Shejarti. Show all posts

Shri Sai baba Shirdi - Shejarti

Shri Sai baba Shirdi - Shejarti

*!! ॐ साई राम !!*
*श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था,शिर्डी*
*!! ॐ Sai Ram !!*
*Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi*
*आरती :- शेजारती*
*सोमवार दिनांक ‌०३ एप्रिल २०२३*     
*Aarti : Shejarti*
*Monday 03 April 2023*


*🌻शेज आरती🌻*

*🌻श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईं नाथ महाराज की जय 🌻*

*आरती माइया सदगुरुनाथा*
*ओंवाळूं आरती माइया सदगुरुनाथा,माइया साईनाथा । जे उत्तम*
*पांचाही तत्वांचा दीप लाविला आतां ।।*
*निर्गुणाची स्थिति कैसी आकारा आली । बाबा आकारा आली ।*
*सर्वा घटीं भरुनि उरली सांई माउली ।। ओंवाळूं 0 ।।*
*रज तम सत्व तिघे माया प्रसवली । बाबा माया प्रसवली ।*
*मायेचिये पोटीं कैसी माया उद्घवली ।। ओंवाळूं 0 ।।*
*सप्तसागरी कैसा खेळ मांडीला । बाबा खेळ मांडीला ।*
*खेळूनियां खेळ अवघा विस्तार केला ।। ओंवालूं 0 ।।*
*ब्रहांडींची रचना दाखविली डोळां । बाबा दाखविली डोळां ।*
*तुका म्हणे माझा स्वामी कृपाळू भोळा ।। ओंवाळू 0।।*

*2. आरती ज्ञानराजा*

*आरती ज्ञानराजा*
*आरती ज्ञानराजा । महाकैवल्यतेजा ।*
*सेविती साधुसंत । मनु वेधला माझा ।।*
*लोपलें ज्ञान जगीं । हित नेणती कोणी ।*
*अवतार पांडुरंग । नाम ठेविलें ज्ञानी ।।आरती ज्ञानराजा 0।।*
*कनकाचें ताट करीं । उभ्या गोपिका नारी ।*
*नारद तुंबरहो । सामगायन करी ।। आरती ज्ञानराजा 0।।*
*प्रगट गुहृ बोले । विश्व ब्रहचि केलें ।*
*राम जनार्दनी । पायीं मस्तक ठेविलें ।। आरती ज्ञानराजा 0।।*

*3. आरती तुकारामा*

*आरती तुकारामा*
*आरती तुकारामा । स्वामी सदगुरुधामा ।*
*सच्चिदानन्द मूर्ती । पाय दाखवीं आम्हां ।। आरती तुकारामा ।*
*राघवें सागरांत । जैसे पाषाण तारिले ।*
*तैसे हे तुकोबाचे । अभंग रक्षिले ।। आरती तुकारामा ।*
*तुकितां तुलनेसी । ब्रहृ तुकासी आलें ।*
*म्हणोनी रामेश्वरं । चरणीं मस्तक ठेविलें ।। आरती तुकारामा ।*

*4.जय जय साईनाथ आता*

*जय जय साईनाथ आतां पहुडावें मंदिरीं हो ।। (x2)*
*आळवितों सप्रेमें तुजला आरति घेउनि करीं हो ।। जय 0 ।*
*रंजविसी तूं मधुर बोलुनी माय जशी निज मुला हो ।।(x2)*
*भोगिसि व्याधी तूंच हरुनियां* *निजसेवकदःखाला हो ।। (x2)*
*धांवुनि भक्तव्सन हरिसी दर्शन देसीत्याला हो ।।(x2)*
*झाले असतील कष्ट अतिशय तुमचे या देहाला हो ।। जय 0 ।*
*क्षमा शयन सुंदर ही शोभा सुमनशेज त्यावरी हो । (x2)*
*ध्यावी तोडी भक्त-जनांची पूजनादि चाकरी हो ।। (x2)*
*ओंवाळीतों पंच्राण, ज्योति सुमती करीं हो ।। (x2)*
*सेवा किंकर भक्त प्रीती अत्तर परिमळ वारी हो ।। जय 0 ।*
*सोडुनि जाया दुःख वाटतें साई त्वच्चर णांसी हो । (x2)*
*आज्ञेस्तव तव आशीप्रसाद घेउनि निजसदनासी हो ।।(x2)*
*जातों आतां येऊं पुनरपि त्वच्चरणाचे पाशीं हो । (x2)*
*उठवूं तुजला साइमाउले निजहित सादायासी हो ।। जय 0 ।*

*5.आतां स्वामी सुखें निद्रा*

*आतां स्वामी सुखें निद्रा करा अवधूता । बाबा करा साइनाथा ।।*
*चिन्मय हें सुखधामा जाउनि देवा पहुडा एकांता ।।*
*वैराग्याचा कुंचा घेउनि चौक झाडीला । बाबा चौक झाडीला ।।*
*तयावरी सुप्रेमाचा शिडकावा दिधला ।। आतां 0 ।।*
*पायघडया घातल्या सुंदर नवविधा भक्ती । बाबा नवविधा भक्ती ।।*
*ज्ञानाच्या समया लावुनि उजळल्या ज्योती ।। आतां 0 ।।*
*भावार्थाचा मंचक हृदयाकाशी टांगिला । बाबा काशीं टांगिला ।।*
*मनाचीं सुमनें करुनी केलें शेजेला ।। आतां 0 ।।*
*द्घैताचें पाट लावुनि एकत्र केलें । बाबा एकत्र केलें ।।*
*दुर्बुद्घीच्या गांठी सोडूनि पडदे सोडीले ।। आतां 0 ।।*
*आशा तृष्णा कल्पनेचा सांडुनि* *गलबला । बाबा सांडुनि गलबला ।।*
*दया क्षमा शांति दासी उभ्या सेवेला ।। आतां 0 ।।*
*अलक्ष्य उन्मनी घेउनी बाबा नाजुक दुःशाला । बाबा नाजुक दुःशाला ।।*
*निरंजन सदगुरु स्वामी निजवीले शेजेला ।। आतां 0 ।।*
*।। सच्चिदानद सद्गुरु साईंनाथ महाराज की जय ।।*
*।। श्री गुरुदेव दत्त ।।*

*6.पाहें प्रसादाची वाट*

*पाहें प्रसादाची वाट । घावें धुवोनियां ताट ।।*
*शेष घेउनी जाईन । तुमचें झालिया भोजन ।।*
*झालों आतां एकसवा । तुम्हा आळंवावो देवा ।।*
*तुका म्हणे आतां चित्त । करुनी राहिलों निश्चित ।।*

*7.पद, प्रसाद मिळाल्यावर

*पावला प्रसाद आतां विठो निजावें । बाबा आता निजावे ।*
*आपला तो श्रम कळों येतसे भावें ॥*
*आतां स्वामी सुखें निद्रा करा गोपाळा । बाबा साई दयाला।*
*पुरलें मनोरथ जातों आपुल्या स्थळा ॥*
*तुम्हांसी जागवूं आम्हीं आपुलिया चाडा । बाबा आपुलिया चाडा ।*
शुभाशुभ कर्मे दोष हरावया पीडा ॥ आतां स्वामी 0।।
तुका म्हणे दिधलें उच्छिष्टाचें भोजन । उच्छिष्टाचें भोजन ।
*नाहीं निवडिलें आम्हां आपुलिया भिन्न ॥ आतां स्वामी 0।।।*  

           *🌻ॐ नमोः श्री गुरुदेव दत्त।🌻*

🌻जयघोष - ॐ अनंतकोटि ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज पर ब्रम्ह श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय॥🌻*

पर यह लेख अच्छा लगा तो WhatsappFacebook & Telegram  पर शेयर और फॉरवर्ड अवश्य करें जिससे अन्य लोग भी ये जानकारी पढ़ सकें।

अस्वीकरण (Disclaimer) : नुस्खे, योग, धर्म, ज्योतिष आदि विषयों पर प्रकाशित/प्रसारित वीडियो, आलेख एवं समाचार सिर्फ आपकी जानकारी के लिए हैं। इनसे संबंधित किसी भी प्रयोग से पहले विशेषज्ञ की सलाह जरूर लें

SHARE NOW